शिका प्रभावी भाषणकला व सूत्रसंचालन
दीपस्तंभ वक्तृत्व विकास पुणे या संस्थेच्या माध्यमातून प्रभावी भाषण व सूत्रसंचालन कसे करावे या संदर्भात प्रशिक्षण दिले जाते.
महत्त्वपूर्ण सूचना
1) क्लास ची नवीन बॅच प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी सुरू होते. एकूण चार रविवार प्रशिक्षण दिले जाते.
2) प्रशिक्षणाची वेळ 12.30 ते 4.30 ही आहे.
3) प्रशिक्षणामध्ये भाषण व सूत्रसंचालनासाठी लागणारी सर्व तंत्रे शिकवून भाषण व सूत्रसंचालनाचा सराव करुन घेतला जातो.
4) ज्यांनी अनेक वर्षे व्याख्याते,निवेदक म्हणून काम केले आहे तथा राज्य व जिल्हा स्तरावर विविध भाषण स्पर्धांमधून बक्षिसे मिळवली आहेत असे अनुभवी प्रशिक्षक प्रशिक्षण देतात.
5) *भाषण कसे तयार करावे?त्यातील मुद्दे कसे निवडावेत?त्यांचा क्रम कसा निश्चित करावा?भाषण न विसरता ध्यानात कसे ठेवावे?आणि प्रभावी सुरुवात,प्रभावी मध्य व प्रभावी शेवट करुन सभा कशी गाजवावी याचे A to Z मार्गदर्शन केले जाते.
6) *या प्रशिक्षणातून भाषणाची भिती दूर होऊन आत्मविश्वासाने हजारो लोकांसमोर धाडसाने भाषण करण्याची क्षमता खात्रीपूर्वक वृद्धींगत होते.
7) *आवश्यक सर्व नोटस् व लेखन साहित्य पुरवले जाते
8) *चहा व नाश्त्याची व्यवस्था केली जाते.
9) *वेळोवेळी भाषण स्पर्धा,नामवंत व तज्ञ मार्गदर्शकांची कार्यशाळा,तसेच प्रशिक्षणार्थी वक्त्यांना संधी म्हणून त्यांच्या भाषणांचे कार्यक्रम आदी उपक्रम राबविण्यात येतात.
10) वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या प्रशिक्षणार्थ्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरन्वीत करण्यात येते.
11) सुयोग्य व सुसज्ज असे प्रशिक्षण स्थळ असून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत.
12) 11 वर्षापुढील सर्व वयोगट प्रशिक्षणासाठी पात्र आहे.
13) प्रत्येक बॅचसाठी मर्यादीत जागा असल्याने प्रत्येकाने आपला प्रवेश निश्चित करुनच प्रशिक्षणासाठी यावे.
14 ) संपूर्ण कोर्स पूर्ण केल्यानंतर दिलेला आभ्यास व नियमीत सराव ही यशस्वी व प्रभावी वक्त्याची गुरुकिल्ली आहे.
